Ganesh Sonawane
यमनमधील 'अल-हुतेब' हे गाव पृथ्वीवरील एक अनोखं ठिकाण आहे. आजपर्यंत इथे एक थेंबही पाऊस पडलेला नाही.
अल-हुतेब गाव डोंगरावर वसलेलं असून, निसर्गसौंदर्य आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे.
हे गाव समुद्रसपाटीपासून तब्बल 3,200 मीटर उंच आहे. ढग त्याच्या खालच्या थरात तयार होतात, म्हणून पाऊस पोहोचत नाही.
पावसाचे ढग गावाच्या खाली तयार होतात आणि गावाच्या खालीच पाऊस कोसळतो. त्यामुळे हे पाणी वर गावात नेलं जातं. त्यामुळे गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे.
इतक्या उंचीवर आणि कोरड्या हवामानातही इथली वास्तुकला, जीवनशैली आणि निसर्ग सौंदर्य टिकून आहे.
पाऊस नसला तरी गावात पर्यटकांची सतत गर्दी असते. गावाचं लोकेशन आणि दृश्य खूपच अद्भुत आहे.
येथील बहुतांश लोक अल-बोहरा वा अल-मुकरमा समाजातील आहेत. त्यांची परंपरा आणि जीवनशैली वेगळीच भासते.
लोक म्हणतात, ‘इथे पाऊस नसलं तरी शांतता, हवामान आणि दृश्य स्वर्गात असल्यासारखं भासवतात.’
हिवाळ्यात इथे हाडं गोठवणारी थंडी असते, तर उन्हाळ्यात सूर्याची तीव्रता प्रखर असते.