सरकारनामा ब्यूरो
गॅब्रिएल अटल हे फ्रान्सचे नवे पंतप्रधान झाले आहेत.
एलिझाबेथ बोर्न यांनी राजीनामा दिल्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नव्या पंतप्रधानांची घोषणा केली.
देशातील लोकप्रिय राजकारणी नवनियुक्त पंतप्रधान गॅब्रिएल अटल हे अवघ्या 34 वर्षांचे आहेत.
आतापर्यंत या पदावर काम करणारे ते पहिले खुले समलिंगी पुरुष (जाहीरपणे सांगणारे) आणि फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.
17 वर्षांचे असताना त्यांनी सोशलिस्ट पार्टीतून राजकारणात पहिले पाऊल टाकले अन् फ्रान्सचा लोकप्रिय अन् नवा तरुण चेहरा बनले.
गॅब्रिएल अटल हे जगातील सर्वात शक्तिशाली LGBTQ राजकारणी आणि पहिले समलैंगिक संघटनेचे प्रमुख आहेत.
पंतप्रधान होण्याआधी त्यांनी शिक्षण आणि राष्ट्रीय युवा मंत्रिपदावर काम केले आहे.
फ्रेंचच्या सार्वजनिक शाळांमध्ये बुरखा परिधान करण्यावर बंदी आणली. हा निर्णय जगभरात वादग्रस्त ठरला. तसेच गुंडगिरीबद्दल जागरुकता निर्माण करण्याचे काम त्यांनी केले.
आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांची इतिहासात नोंद झाली आहे.