Rashmi Mane
डिजीटल युगात आपले पैसे आणि माहिती सुरक्षित ठेवणे गरजेचे झाले आहे. छोट्या चुकीची मोठी किंमत मोजावी लागू शकते.
मोबाइल/लॅपटॉपवर खरे URL तपासा “https” आणि लॉक चिन्ह तपासा. मोठ्या सेल्समध्ये आणि ऑफर्समध्ये तातडीचे शॉपिंग करू नका.
ईमेल, SMS, WhatsApp, Telegram मधील अज्ञात लिंक क्लिक करू नका. फिशिंगचा धोका लक्षात ठेवून बँक व्यवहार करा.
मजबूत पासवर्ज टाका, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पासवर्ड ठेवा. शक्य तेथे (OTP/Authenticator) चालू करा.
दररोज/साप्ताहिकपणे बँक आणि क्रेडिट कार्ड स्टेटमेंट तपासा. गैर अधिकृत व्यवहार आढळल्यास ताबडतोब बँकेत रिपोर्ट करा.
सार्वजनिक Wi‑Fi वापरून पेमेंट करू नका.
मोबाइल, ब्राऊझर, अॅप्स आणि अँटीव्हायरस नियमित अपडेट ठेवा. हे ऑनलाइन फ्रॉडपासून बचाव करू शकते .
इनकम टैक्स रिफंड किंवा SIM ब्लॉक सारखे बनावट मेसेज व कॉल्स येऊ शकतात. तर IGNORE करा आणि रिपोर्ट करा.