Rashmi Mane
UPSC परीक्षेत देशात आठवा आणि महाराष्ट्रात प्रथम आलेल्या सोलापूर जिल्ह्य़ातील योगेश कुंभेजकर.
सातवीतच त्यांनी ‘कलेक्टर’ व्हायचे ठरवले होते.
योगेश यांनी पवईच्या आयआयटीतून बी.टेक केल्यानंतर UPSC परीक्षेची जिद्दीने तयारी केली.
यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाले खरे परंतु त्याची निवड आयपीएस सेवेसाठी झाली. पण त्यांना 'आयएएस' व्हायचे होते. दुसऱ्यांदा परीक्षा देऊन अखेर ते आयएएस अधिकारी बनले.
योगेश कुलकर्णी-कुंभेजकर हे मूळचे माढा तालुक्यातील कुंभेज या गावचे.
योगेश यांचे शालेय शिक्षण हरिभाई देवकरण शाळेत झाले.
योगेश यांचे वडील व्ही. जी. कुलकर्णी हे बँक ऑफ इंडियात अधिकारीपदावर होते. तर आई सुनीता कुलकर्णी पुण्यात स्टेट बँकेत होत्या.