Jagdish Patil
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई सावित्री देवी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले आहे.
उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील पंचूर या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
योगींचे कुटुंब उत्तराखंडमधील पंचूर गावात वास्तव्यास असून त्यांचे वडील आनंद सिंह बिष्ट यांचे यापूर्वीच निधन झाले आहे.
२०२२ मध्ये योगी आईला भेटण्यासाठी पंचूर येथे गेले होते. त्यावेळी आई आणि मुलाच्या भेटीचा भावनिक प्रसंग पाहायला मिळाला होता.
सावित्री देवी यांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिले होते.
काही काळापूर्वी योगी भावाच्या मुलीच्या लग्नासाठी पंचूरला गेले होते. त्यावेळीही त्यांनी आईची भेट घेतली होती.
सावित्री देवी यांच्यावर ऋषिकेश येथील एम्समध्ये उपचार सुरू असताना CM योगी आईला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.
यावेळी त्यांनी आईच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. दोघांमधील हा भावनिक प्रसंग त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता.