Rashmi Mane
राजस्थानमध्ये काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांची जादू चालेल, की ५ वर्षांनंतर सरकार बदलण्याचा ट्रेंड कायम राहील, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत ‘राजस्थानचे योगी’ म्हटल्या जाणार्या 'बाबा बालकनाथ' यांची सर्वाधिक चर्चा आहे.
या निवडणुकीत बालकनाथ यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे.
नेहमी भगव्या कपड्यात दिसणारे बाबा बालकनाथ हे भाजपचे फायरब्रँड नेते आहेत.
हिंदुत्वाच्या अजेंड्यावर आक्रमक भूमिका घेतल्याने ते नेहमीच चर्चेत असतात.
बाबा बालकनाथ 2019 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले.
बाबा बालकनाथ हे नाथ संप्रदायाचे महत्त्वाचे ठिकाण असलेल्या मस्तनाथ मठाचे महंत आहेत.
रोहतक येथील बाबा मस्तनाथ मठाचे महंत बालकनाथ हेदेखील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जवळचे आहेत.