Aslam Shanedivan
IPS किंवा IAS होणं इतकं सोपं नाही. येथे जीद्द चिकाटी आणि मेहत केल्यानंतरच यश मिळतं.
असंच यश हर्षवर्धन यांना मिळालं, मात्र त्यांना पदाच्या खुर्चीवर बसता आलं नाही. ट्रेनिंग संपवून प्रशिक्षणार्थी IPS अधिकारी रजू होण्यासाठी निघाला, मात्र पोहचलाच नाही.
आयपीएस अधिकारी हर्षवर्धन यांचा हसन येथे भीषण अपघात झाला. त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
हर्षवर्धन म्हैसूरहून हसनला पोलिस जीपमधून प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या गाडीचा अपघात झाला.
हर्षवर्धन हे 2023 च्या बॅचचे होते. तर त्यांचे नुकताच मैसूर येथे प्रशिक्षण होते. ते प्रशिक्षण पूर्ण करुन ते मध्य प्रदेशला निघाले होते
तर त्यांच्या गाडीचा अपघात हा टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
या अपघाताच्या माहितीनंतर अनेक तरुणांनी एक्सवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.