Mayur Ratnaparkhe
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात २०१८ बॅचचे आयएएस अधिकारी प्रतीक जैन यांनी नवीन डीएम म्हणून पदभार स्वीकारला आहे.
प्रतीक जैन यांनी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली.
अशाप्रकारे, प्रतीक जैन हे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील सर्वात तरुण डीएम बनले आहेत
प्रतीक जैन यांनी रुद्रप्रयाग जिल्ह्याचे डीएम म्हणून पदभार स्वीकारताच, त्यांनी प्रथम केदारनाथ पायी जाण्याच्या मार्गाचा आढावा घेतला.
प्रतीक जैन हे २०१८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
२०१६ मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु त्यांना अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळू शकले नव्हते.
दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी २०१७ मध्ये यूपीएससी सीएसई परीक्षा उत्तीर्ण केली आणि भारतात ८६ वा क्रमांक मिळवला.
याआधी त्यांनी भारतीय वन सेवेत एक वर्ष सेवा बजावली आहे.
प्रतीक जैन हे सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेचा विषय बनलेले आहेत.