Deepak Kulkarni
एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. ब्रिटनच्या एका 20 वर्षांच्या या तरुणानं चक्क नव्या देशाची निर्मिती करुन दाखवली आहे.
या तरुणानं मोठं धाडसी पाऊल टाकताना क्रोएशिया आणि सर्बिया यांच्यातील एका वादग्रस्त जमिनीवर स्वतःचा एक नवीन देश तयार केला आहे.
‘द फ्री रिपब्लिक ऑफ वर्डिस’ असं या देशाचं नाव आहे.
सुमारे 125 एकर जमीन आणि जो डॅन्यूब नदीच्या काठावर हा वर्डिस देश वसलेला आहे.
डॅनियल जॅक्सननं स्वतःला वर्डिस देशाचा राष्ट्रपती म्हणूनही घोषित केले आहे.
डॅनियलच्या नव्या देशाला स्वतःचा झेंडा असून युरो हे कायदेशीर चलन आहे. तसेच तिथे इंग्रजी, क्रोएशियन आणि सर्बियन भाषा बोलल्या जातात.
विशेष म्हणजे या छोट्याशा देशाला एक छोटे मंत्रिमंडळ सुध्दा आहे.
या देशाचे आतापर्यंत सुमारे 400 लोक अधिकृत नागरिक बनले आहेत.
या देशाला सध्या डॉक्टर, पोलीस यांसारख्या नागरिकांची जास्त आवश्यकता आहे.
डॅनियल जॅक्सनवर क्रोएशियात आजीवन बंदी घातली असून वर्डिस देशाचा कारभार याघडीला ऑनलाइन पध्दतीनं सुरू आहे. हजारो लोकांनी वर्डिसच्या पासपोर्ट आणि नागरिकत्वासाठी उत्सुकता दर्शवली आहे.