Mayur Ratnaparkhe
युवक काँग्रेसच्या वतीने आज पुण्यात मोदी सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब यांनी केले.
या आंदोलनासाठी मोठ्यासंख्येने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते.
बालगंधर्व चौकात आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून अडविण्यात आले.
तर काही आंदोलन करणार्या युवकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले.
"नोकरी द्या नशा नको" अशा घोषणा देत काँग्रेस भवन येथून पदयात्रा करीत हल्लाबोल आंदोलन सुरु करण्यात आले.
मोदी सरकारने भारताची प्रतिमा खराब केली आहे. हे सरकार झोपेचे सोंग घेऊन बसले आहे, असा आरोप चिब यांनी यावेळी त्यांनी केला.
महाराष्ट्रात वाढती बेरोजगारी आणि त्यामुळे वाढणारे गुन्हे यावर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी हे आंदोलन केले गेले.