Roshan More
पवार कुटुंबीयामध्ये नवीन सुनेचे आगमन झाले आहे. युगेंद्र पवार यांचा आज साखरपुडा संपन्न झाला
खासदार सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र–तनिष्काच्या साखरपुडा होणार असल्याची माहिती देत तनिष्काचे पवार कुटुंबात स्वागत केले होते.
युगेंद्र पवार यांचा तनिष्का यांच्यासोबत आज मुंबईत साखरपूडा झाला.
युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे पुत्र, अजित पवारांचे पुतणे तसेच शरद पवारांचे नातू असून राजकारणात सक्रिय आहेत.
युगेंद्र यांनी अजित पवारांविरुद्ध विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढली होती.
तनिष्का कुलकर्णी या मुंबईकर असून त्यांचे वडील उद्योगपती आहेत.
तनिष्का यांनी मुंबईत प्राथमिक शिक्षण घेतले असून उच्च शिक्षण लंडनमध्ये घेतले आहे.