Yusuf Pathan Lok Sabha 2024 Candidature : धुव्वाधार बॅटिंग करणारा युसूफ पठाण लोकसभेच्या 'पिच'वर; कशी आहे कामगिरी?

Chetan Zadpe

लोकसभेची उमेदवारी -

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांनी आता सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. बंगालमधील बहरमपूर मतदारसंघातून टीएमसीकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे.

Yusuf Pathan Lok Sabha 2024 Candidature | Sarkarnama

काँग्रेसशी सामना -

युसूफ पठाण यांना टीएमसीने तिकीट दिले आहे. त्यांचा सामना काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्याशी होणार आहे. अधीर रंजन चौधरी हे बहरामपूरचे विद्यमान खासदार आहेत.

Yusuf Pathan Lok Sabha 2024 Candidature | Sarkarnama

क्रिकेट पदार्पण -

युसूफ पठाणने टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलपूर्वी वीरेंद्र सेहवाग दुखापतग्रस्त झाल्यामुळे पठाण सलामीला फलंदाजीस आला.

Yusuf Pathan Lok Sabha 2024 Candidature | Sarkarnama

विश्वचषक संघाचा भाग -

युसूफ पठाण 2007 टी -20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. 2011 चा विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरला आपल्या खांद्यावर घेतले होते.

Yusuf Pathan Lok Sabha 2024 Candidature | Sarkarnama

दोन दमदार शतके -

युसूफ पठाणने आपल्या वनडे कारकिर्दीत 41 एकदिवसीय डावात एकूण 810 धावा केल्या. या 41 डावांमध्ये 2 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.

Yusuf Pathan Lok Sabha 2024 Candidature | Sarkarnama

जबरदस्त स्ट्राईक रेट -

युसूफ पठाणन यांनाही भारतासाठी 18 टी-20 डावात एकूण 236 धावा केल्या. त्यांचा बॅटिंगचा स्ट्राइक रेट 146.58 होता. गोलंदाजी करताना त्यांनी एकदिवसीय सामन्यात 33 आणि टी-20 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या.

Yusuf Pathan Lok Sabha 2024 Candidature | Sarkarnama

37 चेंडूत शतक -

आयपीएलमध्येही युसूफ पठाण यांनी दमदार कामगिरी केली आहे. IPL च्या पहिल्या सीजनमध्ये राजस्थान संघाकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध केवळ 37 चेंडूत शतक झळकावले होते.

Yusuf Pathan Lok Sabha 2024 Candidature | Sarkarnama

NEXT : अमित शाहांची भेट घेणारे पवनकल्याण कोण आहेत?

Sarkarnama
क्लिक करा..