Roshan More
महानगरपालिका आणि नगरपालिकांप्रमाणे आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे.ग्रामविकास विभागाने याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केल्यामुळे नियुक्तीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.
या नव्या निर्णयामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नवीन एकूण १ हजार ५ स्वीकृत सदस्यांची भर पडणार आहे. आणि स्वीकृत सदस्य नियुक्तीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.
34 जिल्हा परिषदांमध्ये एकूण 201 स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत.
राज्यातील पंचायत समित्यांमध्ये 804 नामनिर्देशित सदस्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे.
केवळ राजकीय कार्यकर्तेच नव्हे, तर वकील, शिक्षक, प्राध्यापक व तज्ज्ञ व्यक्तींना यात संधी मिळणार आहे.त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग स्थानिक विकासकामांमध्ये व प्रशासकीय सल्ल्यासाठी केला जाईल.
संबंधित राजकीय पक्षांच्या सभागृहातील तौलनिक संख्याबळानुसार या जागांचे वाटप केले जाईल.यासाठी पक्षांना जिल्हाधिकाऱ्यांकडे गटनोंदणी करून पक्षनेत्यांशी विचारविनिमय करावा लागणार आहे.
स्वीकृत सदस्यांना कामकाजात आणि चर्चेत सहभागी होता येईल, पण त्यांना मतदानाचा अधिकार नसेल.तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सभापती पदांच्या निवडणुकीसाठी हे सदस्य पात्र ठरणार नाहीत.