Jagdish Patil
न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि भारतीय वंशाचे जोहरान ममदानी (34) विजयी झालेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रखर विरोध करूनही ममदानी विजयी झाले. ममदानी हे भारताचे पंतप्रधान मोदींवर सतत टीका करत असतात.
तर महापौरपदाच्या निवडणुकीत ममदानी विजयी होताच आता त्यांच्यी पत्नी रमा दुवाजी चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर रमा दुवाजी या नेमकं काय करतात याबाबतची माहिती आपण जाणून घेऊया.
रमा दुवाजी या सीरियन वंशाच्या इलस्ट्रेटर आणि अॅनिमेटर आहेत. सध्या त्या न्यूयॉर्क शहरात ब्रुकलिन येथे राहतात.
रमा दुवाजी या मूळच्या दमास्कस, सीरिया येथील आहेत 2021 मध्ये त्या न्यूयॉर्कमध्ये आल्या.
त्यांनी अमेरिकेतील व्हर्जिनिया कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीतून पदवी तर न्यू यॉर्कमधील स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्स येथून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
त्यांना सीरियन अमेरिकन चित्रकार म्हणून ओळखलं जातं. त्या एक मल्टीमीडिया कलाकार आहेत आणि त्या पॅलेस्टाईन समर्थक थीमवर काम करतात.
कलेच्या माध्यमातून त्या अनेक धाडसी विषयांना हात घालतात. त्यांनी अनेकदा पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे.
ममदानी महापौरपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बनले होते तेव्हा त्यांनी विजयी भाषणात आपल्या विजयासाठी पत्नीचे आभार मानत त्यांच्या हाताचे चुंबन घेतलं होतं.
तर एका मुलाखतीत ममदानी यांनी त्यांची आणि पत्नी रमा यांची भेट 'हिंज' या डेटिंग अॅपवरून झाल्याचं सांगितलं होतं.