Deepak Kulkarni
राज्य निवडणूक आयोगाकडून 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार, राज्यात ZP आणि पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.
याचवेळी निवडणूक आयोगानं दोन्ही निवडणुकीतील उमेदवारांसाठी खर्चाच्या मर्यादेबाबतही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
71 ते 75 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी 9 लाख आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांसाठी 6 लाख रुपये खर्च मर्यादा असणार आहे.
तसेच 61 ते 70 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी 7 लाख 50 हजार आणि त्यातंर्गतच्या पंचायत समित्यांसाठी 5 लाख 25 हजार रुपये खर्च मर्यादा असेल.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 50 ते 60 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी 6 लाख व त्यातंर्गत पंचायत समित्यांसाठी 4 लाख 50 हजार रुपये खर्च मर्यादा राहणार आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केल्यापासून नवी आचारसंहिता लागू करण्यात आली.
याचवेळी आयुक्तांनी दोन्ही निवडणुकांच्या उमेदवारांसाठी अर्ज भरण्याचा निवडणूक कार्यक्रमही जाहीर केला आहे.