Girls Out Of School Worldwide UNESCO : 'युनेस्को'चा धक्कादायक अहवाल; जगभरात 13.3 कोटी मुली शाळाबाह्य, नेमकं काय कारण?

Pradeep Pendhare

'युनेस्को'चा अहवाल

'युनेस्को'च्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग विभागाने तीन दशकांत शिक्षण क्षेत्राचा अहवालात मांडताना गंभीर निरीक्षण नोंदवलेत. UNESCO

UNESCO | Sarkarnama

शिक्षणातील लिंगसमानता

लिंगसमानतेकडे जगाने वेगवान वाटचाल केल्याचे समाधानकारक चित्र असले, तरी मुलींच्या शिक्षणावर गंभीर निरीक्षण नोंदवलं आहे.

UNESCO | Sarkarnama

जगाची प्रगती

सन 1995 नंतर शिक्षण क्षेत्रात लिंगसमानतेमुळे जगाची प्रगती असून, प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये मुलांइतक्याच प्रमाणात मुली शिक्षण घेतात.

UNESCO | Sarkarnama

मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण

जागतिक स्तरावर गेल्या तीन दशकांपेक्षा आता 9.1 कोटी अधिक मुली प्राथमिक शिक्षण घेत आहेत, तर 13.6 कोटी अधिक मुली माध्यमिक शिक्षण घेत आहेत.

UNESCO | Sarkarnama

मुली शिक्षणापासून दूर

जगभरात अद्यापही 13.3 कोटी मुली शालेय शिक्षणापासून वंचित असून, जगभरातील देशांनी यावर ठोस कृती कार्यक्रम राबविण्याची गरज ‘युनेस्को’ने व्यक्त केली.

UNESCO | Sarkarnama

आफ्रिका मागे

ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग टीमच्या मते, मध्य आणि दक्षिण आशियाने माध्यमिक शिक्षणात समानता साधली आहे, तर उपसहारा आफ्रिका विभाग अजूनही मागे आहे.

UNESCO | Sarkarnama

लैंगिक शिक्षण

लैंगिक शिक्षण प्राथमिक स्तरावर सुमारे दोन-तृतीयांश देशांमध्ये आणि माध्यमिक स्तरावर सुमारे तीन-चतुर्थांश देशांमध्ये अनिवार्य आहे.

UNESCO | Sarkarnama

शिक्षण क्षेत्रात महिला

जगभरातील उच्च शिक्षण क्षेत्रातील उच्चपदस्थांमध्ये केवळ 30 टक्केच महिला आहेत. ते वाढवण्याची गरज 'युनेस्को'ने सांगितली.

UNESCO | Sarkarnama

अधोरेखित गरज

'युनेस्को'च्या अभ्यासानुसार, लैंगिक शिक्षण, हिंसा आणि इतर संकटांविरुद्ध लढण्यासाठी संरक्षण, याकडेही लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली आहे. 

UNESCO | Sarkarnama

NEXT : दिलासादायक! अतिवृष्टीभागात सुधारित पंचनामेही पूर्ण

येथे क्लिक करा :