Roshan More
काँग्रेसने संघटनात्मक बदल करण्यात आले असून राज्यांचे प्रभारी बदलले आहे.
महाराष्ट्र प्रभारी पदाची जबाबदारी डाॅ. सिरीवेल्ला प्रसाद यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
ते पक्षाचे सचिव आहेत. मुळचे ते आंध्र प्रदेशातील आहेत.
काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक देखील ते राहिले आहेत.
अर्थशास्त्र विषयात त्यांनी हैद्राबाद विद्यापीठातून पीएच.डी. केली आहे.
आंबेडकरी, दलित चळवळीतील अभ्यासक, नेते म्हणून देखील ते परिचित आहेत.
पंजाबच्या प्रभारीपदाची जबाबदारी सचिन पायलट यांच्याकडे देण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा इम्पोर्टेड चष्मा आजीला दिला गिफ्ट; ब्रँड अन् किंमत ऐकून व्हाल थक्क