Roshan More
काँग्रेस नेते यांनी दिल्लीत ऑटोचालकांची भेट घेतली आहे.
दिल्लीतील एका उद्यानात त्यांनी ऑटोचालकांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत जमिनीवर बसून जेवणही केले.
या भेटीचा व्हिडिओही समोर आला असून त्यात अनेक ऑटोचालक जमिनीवर बसलेले दिसत आहेत. त्यांच्या मध्यभागी राहुल गांधी देखील दिसत आहेत.
या भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी ऑटोचालकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
गेल्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ऑटोचालकांचे उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्याविषयी ऑटोचालकांनी आपल्या समस्या राहुल यांना सांगितल्या.
ऑटोचालकांनी राहुल गांधींना त्यांचा चालकाचा ड्रेस भेट दिला. तो त्यांनी परिधान देखील केला.
त्यांनी ऑटोरिक्षातून देखील प्रवास केला.
रिक्षाचालकांनी मांडलेल्या समस्यानंतर राहुल गांधी म्हणाले, आपण मिळून ही परिस्थिती बदलू. एकत्र येत ही परिस्थिती बदलू.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.