अनुराधा धावडे
22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली येथे जन्मलेल्या अजित पवार यांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील जनता त्यांना दादा नावाने ओळखते
१९८२ साली अजित पवार यांनी राजकारणात प्रवेश केला. सहकारी साखर कारखान्यातील संचालक मंडळावर त्यांची निवड झाली.
1991 साली त्यांची पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली. पुढील सोळा वर्ष ते त्या पदावर होते.
नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012, ऑक्टोबर 2012 ते सप्टेंबर 2014, आणि 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 या काळात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री पद भुषवले आहे.
1995, 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये त्यांनी बारामती मतदारसंघातून विजय मिळवला.
उपमुख्यमंत्री पदासह त्यांनी कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा राज्यमंत्री, जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे, तीन वेळा) अशा खात्यांचीही जबाबदारी सांभाळली.
अजित पवार हे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले नेते आहेत. विशेष म्हणजे ते आधी खासदार होते आणि नंतर ते आमदार झाले.
अजित पवार हे आपल्या वक्तशीरपणासाठीही ओळखले जातात. त्यांच्या वक्तशीपपणामुळे अनेकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.