Rashmi Mane
दिल्लीतील बहुचर्चित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यासह सर्व 23 आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. मात्र या निकालानंतर त्यांच्या संपत्तीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने दिलेल्या निकालामुळे या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला. देशभर गाजलेल्या या खटल्यात सर्व आरोपींना दिलासा देण्यात आला.
मुख्यमंत्री पदावर असताना केजरीवाल काही काळ तिहार तुरुंगात होते. त्यामुळे हे प्रकरण राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले होते.
न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर केजरीवाल यांनी आपण प्रामाणिक असल्याचे सांगितले. त्यांनी हे राजकीय कटकारस्थान असल्याचा आरोप करताना केंद्रातील नेत्यांवरही निशाणा साधला.
2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांचा पराभव झाला. नवी दिल्ली मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी त्यांचा पराभव केला.
निवडणूक शपथपत्रानुसार केजरीवाल यांची एकूण संपत्ती सुमारे 4.24 कोटी रुपये आहे. त्यांच्या नावावर कोणतेही कर्ज नाही. देणी शून्य असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
त्यांच्या शपथपत्रात नमूद केल्याप्रमाणे, रोख स्वरूपात त्यांच्याकडे फक्त 50 हजार रुपये आहेत. बँक खात्यात सुमारे 3 लाख रुपये जमा आहेत.
केजरीवाल यांनी कोणत्याही शेअर, बाँड किंवा गुंतवणूक योजनांमध्ये पैसा गुंतवलेला नाही. त्यांच्या नावावर दागिने, वाहन किंवा विमा पॉलिसीही नाही.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे त्यांच्या नावावर सुमारे 1.70 कोटी रुपयांची एक मालमत्ता आहे. शेती जमीन किंवा इतर व्यावसायिक इमारत त्यांच्या नावावर नाही. आमदार म्हणून मिळणारे वेतन हेच त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.