Amit Ujagare
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) अंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळतो.
उत्पन्नाचा कोणतीही अट न ठेवता ७० वर्षांवरील सर्व वृद्धांना 'आयुष्यमान भारत' मेडिक्लेम योजनेचा लाभ मिळतो.
२०११च्या SECC जनगणनेनुसार गरीब आणि मजूर कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येतो. यामध्ये अनुसूचित जाती-जमाती (SC/ST), भूमिहीन मजूर, निराधार, आदिवासी समुदायांचा समावेश होतो.
ज्या कुटुंबात १६ ते ५९ वयोगटातील कोणताही प्रौढ पुरुष नाही, इथं महिलाच कुटुंब प्रमुख आहे. तसंच या कुटुंबाकडं कच्चं घर आहे, किंवा दिव्यांग व्यक्ती असलेली कुटुंबं यांनाही या योजनेचा लाभ घेता येतो.
ज्या व्यक्ती आयकर भरतात, सरकारी नोकरीत किंवा ESIC आणि पीएफचा लाभ घेतात, अशा श्रीमंत वर्गातील लोकांना याचा लाभ मिळत नाही.
घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून पोर्टलवरुन किंवा अॅपमधून मोफत अर्ज करू शकता. त्यासाठी अधिकृत Ayushman Portal वर जा किंवा मोबाईलमध्ये 'Ayushman App' डाऊनलोड करा.
तुमचा चालू मोबाईल क्रमांक टाका आणि OTP द्वारे लॉगिन करा. त्यानंतर तुमचं राज्य, जिल्हा आणि आधार कार्ड किंवा रेशन कार्ड नंबर टाकून तुमची पात्रता तपासा.
आधार OTP, फिंगरप्रिंट किंवा फेस ऑथेंटिकेशनद्वारे तुमची ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर (२-३ दिवसांत) तुम्ही पोर्टलवरून तुमचे आयुष्मान कार्ड PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.