Vijaykumar Dudhale
जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना डावलून भारतीय जनता पक्षाने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
विशेष म्हणजे मागील 2019 च्या निवडणुकीत स्मिता वाघ यांना जाहीर झालेली उमेदवारी ऐनवेळी कापून उन्मेष पाटील यांना देण्यात आली होती.
लोकसभेला डावलण्यात आल्यानंतर उन्मेष पाटील यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
खासदार उन्मेष पाटील यांच्यासमवेत पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांनीही मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला
राज्यात बदला घेण्याची भावना रुजवली जात आहे. पण, मला त्या पापाचे वाटेकरी व्हायचे नव्हते, त्यामुळे मी स्वाभिमान जपत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सांगितले.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उन्मेष पाटील यांनी भाजपवर आरोप करताना मला एका भावाने दगा दिला; मात्र दुसरा भाऊ शिवसेना माझ्यासोबत आहे, याचा मला आनंद आहे, असे म्हटले.
शिवसेनेने जळगावमधून उन्मेष पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे.
जळगावमध्ये आता शिवसेनेचे करण पवार यांच्या विरोधात भाजपच्या स्मिता वाघ अशी लढत रंगणार आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.