Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे 'ऑन फिल्ड', महामार्गवर उतरत बुजवले खड्डे

Roshan More

'मुख्यमंत्री 'अ‍ॅक्शन मोड'वर

मुंबई-नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा आणि वाहतूक कोंडीचा नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत बैठक घेतली होती.

Eknath Shinde | sarkarnama

खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावर

बैठकीत सुचवलेला खड्डे बुजवण्याचा पर्याय आणि त्यांच्या अंमलबजावणीची मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः दौरा करून पाहणी केली.

Eknath Shinde | sarkarnama

कामाचा आढावा

ठाणे-नाशिक महामार्गावर शहापूर जवळील तळवली गावापाशी सुरू असलेल्या खड्डे बुजवण्याचा कामाचा मुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा घेतला.

Eknath Shinde | sarkarnama

खड्डे बुजवण्यासाठी नवे तंत्रज्ञान

जिओ पॉलिमर टेक्नोपॅचचा वापर करून हे खड्डे बुजवण्यात येत आहेत. यामुळे अल्पावधीतच रस्त्यावरील खड्डे बुजवून ते लगेचच कडक होऊन अवजड वाहनेही सहज यावरून ये-जा करू शकतील.

Eknath Shinde | sarkarnama

नवीन पूलाच्या कामाची पाहणी

मुख्यमंत्री शिंदे यांनी खारीगाव पूल, साकेत पूल येथे तयार होत असलेल्या नवीन पुलाच्या कामाचा आढावा घेतला.

Eknath Shinde | sarkarnama

महत्त्वाच्या सूचना

कामाचा आढावा घेताना मुख्यमंत्री शिंदे यांनी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याच्या सूचना केल्या.

Eknath Shinde | sarkarnma

अधिकारी उपस्थित

मुख्यमंत्री पाहणी दौऱ्यावेळी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डी.एस.स्वामी आदी अधिकारी उपस्थित होते.

Eknath Shinde | sarkarnama

NEXT : राज्यसभेत आक्रमक होणाऱ्या जया बच्चन यांचे पुण्याशी आहे खास नाते..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jaya Bachchan | sarkarnama
येथे क्लिक करा