Dinvishesh 8 February : काय घडलं होतं त्या वर्षी वाचा आजच्या ऐतिहासिक घटना..

Rashmi Mane

1897 - भारताचे तिसरे राष्ट्रपती व नामवंत शिक्षणतज्ज्ञ डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म. महात्मा गांधींच्या शिक्षणविषयक कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी अलिगड येथे जामिया मिलिया ही संस्था स्थापन केली. 1963 मध्ये त्यांना "भारतरत्न' पुरस्कार देण्यात आला.

1899 - रँडचा वध करणाऱ्या चापेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणाऱ्या द्रविड बंधूंचा वासुदेव चापेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला

1952 - दुसऱ्या एलिझाबेथ राणीचा राज्याभिषेक. साठ वर्षे कारभार करणाऱ्या व्हिक्‍टोरिया राणीच्या खालोखाल एलिझाबेथ यांची कारकीर्द प्रदीर्घ झाली आहे.

1971 - मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एजंट जनरल, नामवंत साहित्यिक आणि "भारतीय विद्याभवन'चे संस्थापक डॉ. कन्हय्यालाल मुन्शी यांचे निधन.

1971- NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजार निर्देशांक सुरू झाला.

1994 - ख्यातनाम चित्रकार गोपाळराव देऊसकर यांचे मध्यरात्री निधन. बालगंधर्व रंगमंदिरातील तैलचित्रे, टिळक स्मारक मंदिरातील भित्तिचित्रे, फर्ग्युसनच्या नामवंत विद्यार्थ्यांची तैलचित्रे ही त्यांची कामे प्रसिद्ध आहेत.

1995 - भारताचे माजी नौदलप्रमुख ऍडमिरल भास्करराव सोमण यांचे निधन. 1965 च्या युद्धाच्या काळात ते नौदलप्रमुख होते. सरसेनापती पदापर्यंत जाणारे ते पहिले मराठी अधिकारी होते.

Next : परराष्ट्रमंत्र्यांचे 'जपानी' प्रेम; तुम्हाला माहितीये का? त्यांची भन्नाट 'लव्हस्टोरी' 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा