जाणून घ्या नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास...

सरकारनामा ब्यूरो

शिवसेनेसोबत बंडखोरी करून भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून गुरूवारी (ता. 30 जून ) संध्याकाळी शपथ घेतली आहे.

Eknath Shinde Oath | Sarkarnama

एकनाथ शिंदे यांचा जन्म ६ मार्च १९६४ रोजी आपले जन्म ठिकाण सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात अहिर या गावी झाला होता.

Eknath Shinde | Sarkarnama

एकनाथ शिंदे सुरुवातीच्या काळात ते ठाण्याच्या प्रसिद्ध वागळे इस्टेटमधील एका माशांच्या कंपनीत सुपरव्हायझर म्हणून कामाला होते. कालांतराने त्यांनी ही नोकरी सोडत आत्मनिर्भर व्हायचे ठरवले. ठाण्यात ऑटो रिक्षा चालवू लागले. काम करत असताना शिंदे यांच्या आयुष्याला दोन व्यक्तींमुळे कलाटणी मिळाली. त्या व्यक्ती म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाच्या कामाला सुरुवात केली.

Eknath Shinde With Balasaheb Thackeray | Sarkarnama

पक्षाची कामे करताना शिंदेंना आनंद दिघेंचा सहवास लाभला. त्यांच्याप्रती विश्वास वाढू लागला. कालांतराने शिंदे आनंद दिघेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले. 1984 मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी शिंदे यांच्यावर आनंद दिघेंनी जबाबदारी सोपवली. ठाण्याच्या किसन नगरचे शाखाप्रमुख पद त्यांना देण्यात आले. इथूनच खऱ्या अर्थाने शिंदेंच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. ठाणे महापालिकेत 1997 व 2002 दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य आणि चार वर्षे सभागृह नेता म्हणून त्यांनी काम केले.

Late Anand Dhighe With Eknath Shinde | Sarkarnama

2004, 2009, 2014, 2019 चार वेळा आमदार, 2014 ते 2019 विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते तर12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 विधानसभा विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी काम पाहिले. याबरोबरच ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयी होत शिंदे यांनी डिसेंबर 2019 पासून शिवसेनेचे गटनेते तर नोव्हेंबर 2019 पासून नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री होते.

Eknath Shinde With Uddhav Thackeray | Sarkarnama

गेल्या काही दिवसांपुर्वी एकनाथ शिंदे यांंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले होते.

Eknath Shinde With Shivsena MLAs | Sarkarnama

एकनाथ शिंदे यांच्या सोबत उपमुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे.

Eknath Shinde & Devendra Fadnavis | Sarkarnama

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेत असतांना त्यांचे वडील संभाजी शिंदे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sambhaji Shinde | Sarkarnama