सरकारनामा ब्युरो
तडफदार IPS अधिकारी म्हणून ओळखले जाणारे शिवदीप लांडे (IPS Shivdeep Lande) हे पुन्हा बिहारमध्ये जाणार आहेत.
महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर आलेले लांडे यांना महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत कार्यकारी पोस्टिंग मिळाले नाही. आता पुन्हा मूळ केडर असलेल्या बिहारमध्येते रुजू होतील.
आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांना आपल्या मूळच्या राज्यात प्रतिनियुक्तीसाठी पाच वर्षांसाठी येता येते. त्यानुसार ते पाच वर्षांपूर्वी आले.
सुरवाताली त्यांना अमली पदार्थ नियंत्रण विभागाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर त्यांची बढती झाली. दहशतवाद विरोधी पथकात उपमहानिरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले.
मनसुख हिरेन खून प्रकरणाचाा आणि अॅटिंलिया येथे स्फोटके ठेवल्याच्या गुन्ह्याचा तपास आला. मात्र हा तपास नंतर राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) देण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन चांगले काम दाखविण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही.
मूळचे महाराष्ट्रातील अकोला येथील असलेले शिवदीप लांडे हे बिहार केडरचे 2006 च्या बॅचचे अधिकारी आहेत.
त्यांना महाराष्ट्रात जनतेशी थेट संपर्क असलेल्या पदांवर जसे पोलिस उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त किंवा छोट्या शहरांच्या आयुक्त पदावर नेमले जाईल, अशी चर्चा होती.
लांडे यांनी बिहारमध्ये आपल्या कार्यशैलीने खळबळ उडवली होती. त्यांची पहिली पोस्टिंग हे नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर येथे झाली होती.
त्यानंतर बिहारची राजधानी असलेल्या पाटणाच्या अधीक्षकपदी नेमणूक झाली. तेथे रोडरोमियो विरोधात त्यांनी कडक कारवाई केली. अशा चुकारांना त्यांनी रस्त्यावरच बेदम चोप दिला.
सर्वसामान्यांसाठी साधे आणि गुन्हेगारांसाठी कठोर असलेले शिवदीप लांडे पाटणा येथील सिटी एसपी असताना प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
ब्रँडेड कंपन्यांच्या नावाने बनावट वस्तू बनवणाऱ्यांवर त्यांनी कडक कारवाई केली होती. त्याचबरोबर बनावट नोटा चलनात आणणाऱ्या, बनावट औषधांची विक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम राबवून त्यांनी खळबळ उडवून दिली होती.
बदमाशांना धडा शिकवण्यासाठी शिवदीप लांडे यांनी आपला वैयक्तिक मोबाईल नंबर मुलींमध्ये शेअर केला होता आणि विनयभंगाची तक्रार असल्यास थेट फोनवर द्या, असे सांगितले होते.
त्यांची लोकांमध्ये अशी लोकप्रियता होती की बिहारच्या पोलीस महासंचालकांनी शिवदीप लांडे यांची पाटणा शहराच्या एसपीवरून पोलीस मुख्यालयात बदली केली तेव्हा लोक रस्त्यावर उतरले. लोकांनी कँडल मार्चही काढला. इतकंच नाही तर त्यांच्या बदलीच्या बातमीने अनेकजण रडतानाही दिसले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.