Dhairyashil Mohite Patil: धैर्यशील मोहिते पाटील माढ्यात महायुतीचा खेळ बिघडवणार!

Deepak Kulkarni

बंडाचं निशाण

माढा लोकसभा मतदारसंघासाठी डावलल्यानंतर मोहिते पाटील यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे.

Dhairyashil Mohite Patil | Sarkarnama

मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता

माढा मतदारसंघात नाट्यमय घडामोडींनंतर आता मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

Dhairyashil Mohite Patil | Sarkarnama

उमेदवार बदलण्याची मागणी

महायुतीत वादाची ठिणगी पडली असून, माढ्यात उमेदवार बदलण्याची मागणी मोहिते पाटलांकडून केली जात आहे.

Dhairyashil Mohite Patil | Sarkarnama

निवडणूक लढविण्यावर ठाम

विशेषतः धैर्यशील आणि जयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माढ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत.

Dhairyashil Mohite Patil | Sarkarnama

माढ्यातून तुतारीवर नेमकं कोण लढणार, याची उत्सुकता

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे अजूनही भाजप सोडायला तयार नाहीत, त्यामुळे माढ्यातून तुतारीवर नेमकं कोण लढणार, याची उत्सुकता आहे.

Dhairyashil Mohite Patil | Sarkarnama

...म्हणून मोहिते पाटील नाराज!

भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटील नाराज आहेत.

Dhairyashil Mohite Patil | Sarkarnama

पवारांची भेट

नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी बुधवारी (ता. 3 ) ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली.

Dhairyashil Mohite Patil | Sarkarnama

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता

धैर्यशील मोहिते पाटील नवीन मराठी वर्षात म्हणजेच 9 एप्रिलनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. 

Dhairyashil Mohite Patil | Sarkarnama

तुतारी हाती घेणार हे जवळपास निश्चित

त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील तुतारी हाती घेणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

R

Dhairyashil Mohite Patil | Sarkarnama

NEXT : ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत पक्षांतरासाठी टणाटण उड्या; 'या' नेत्यांनी बदलला पक्ष!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.