Ganesh Sonawane
आता पोलिस आयुक्तालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रकाराच्या सेवांसाठी पोलिस ठाण्यात वा आयुक्तालयात येण्याची गरज नाही.
त्यासाठी नागरिकांनी ‘आपलं सरकार’ या ऑनलाइन पोर्टलचा लाभ घ्यावा आणि घरबसल्या सेवा मिळाव्यात, असे आवाहन नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.
शासनाने नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळेत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ‘आपलं सरकार’ हे अधिकृत पोर्टल सुरू केले आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून गृह विभागाच्या पोलिस दलातील विविध सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
या सेवांसाठी नागरिकांना पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. अगदी घरबसल्या वा जवळच्या सेवा केंद्रातूनही अर्ज करता येतो. अर्जाबाबतचा तपशीलही तत्काळ ऑनलाइन मिळतो.
त्यामुळे नाशिककरांनी आपलं सरकार पोर्टलवर नोंदणी करून आवश्यक ती कागदपत्रे नोंदवून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.
या आहेत सेवा-
यामध्ये विदेश कलाकारांना सहभागास परवानगी देणे, ध्वनीक्षेपकाचा परवाना देणे- सभा, संमेलन, मिरवणूक, शोभायात्रांना परवानगी देणे. पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, हॉटेल्स, बारसाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे या सेवांचा लाभ घेता येतो.
तसेच पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, सिनेमागृह परवाना, चलचित्रपट प्रदर्शित करावयाच्या जागांना परवाना, कागदपत्रांचे साक्षांकन, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ना हरकत परवाना, नोकरीसाठी वर्तणूक व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र याही सेवांचा समावेश आहे.
शस्त्र परवान्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र, परदेशात जाण्यासाठी पोलिस अनुमती प्रमाणपत्र, सिनेमागृह स्थाननिश्चती परवाना, तक्रारदारास प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) प्रत देणे, तमाशा, मेळ्यांसह सार्वजनिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांना परवाना देणे आदी सेवांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.