सरकारनामा ब्यूरो
पुणे जिल्ह्यात 221 किमी लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा
पुण्यात जल, वायू, ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रयत्न करावा. त्यासाठी पेट्रोल ऐवजी इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा लाभ होईल. नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी शहराबाहेर नवीन शहरे विकसित करावे, अशी सूचना गडकरी यांनी या वेळी केली.
पुणे- कोल्हापूर, पुणे-सोलापूर, पुणे-नगर या ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर मेट्रो सुरू केल्यास बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्यासोबत वाहतूक अधिक गतीमान होईल. पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंगरोडचाही विकास केला जाईल. राज्यातील विकासाचे जेवढे प्रकल्प सुरु आहेत त्यासाठी केंद्राकडून आवश्यक तो निधी व मदत देण्यात येईल, असे गडकरी यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचेही लवकरच भुमिपूजन करण्यात येईल, अशी घोषणा अजित पवार यांनी या वेळी केली.
पुण्याला जगातील आदर्श शहर बनविण्याची जबाबदारी सर्वांची आहे. विकास कामांबाबत कुठलेही राजकारण न आणता नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा देवून वाहतूकीच्या चांगल्या सोयीसुविधा असणारे शहर बनविण्यासाठी प्रयत्न करू, असे अजित पवार यांनी सांगितले.
नव्याने विकसित होत असलेला दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्ग जेएनपीटीपर्यंत जोडण्यात येणार आहे. राज्यातील केंद्र सरकारकडील प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधितांबरोबर लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले. समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून २२१५ कोटी किमतीचा २२१ किमी लांबीचा असे २२ महामार्ग बांधले जाणार आहेत.
२०१५ पासून या कामासाठी प्रयत्न सुरू होते. या उड्डाणपुलामुळे कात्रज- कोंढवामधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.