PFचा नियम बदलला! पगारातून आता 'इतकी'च रक्कम कापली जाणार

Amit Ujagare

1) पीएफचे नियम बदलले

कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफ कापण्याचा जुना नियम EPFO नं बदलला आहे. 'EPF Scheme 2026' २९ जूनपासून लागू करण्यात आली आहे. ज्यात कर्मचाऱ्यांच्या पगारातून PF कापणीची मर्यादा स्पष्ट करण्यात आली आहे.

EPFO

2) मुख्य बदल काय?

कायद्यानुसार अनिवार्य PF योगदान फक्त ₹15,000 वेतन मर्यादेपर्यंतच राहील. म्हणजेच कर्मचाऱ्याकडून केवळ ₹1,800 (12% of ₹15,000) आणि कंपनीकडूनही ₹1,800 अनिवार्य आहे.

EPFO

3) अधिक पगार असणऱ्यांना..

₹15,000 पेक्षा जास्त बेसिक सॅलरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पूर्ण सॅलरीवर 12% PF कापणे अनिवार्य नाही. म्हणजेच त्यांच्या पगारातून केवळ १८०० रुपयेच कापले जातील वरची रक्कम स्वेच्छा योगदान म्हणून राहील.

EPFO

4) फायदा :

ज्यांची बेसिक सॅलरी ₹15,000 पेक्षा जास्त आहे, त्यांच्या टेक-होम सॅलरी (हातात येणारा पगार) वाढेल कारण जास्त PF कापला जाणार नाही (जर स्वेच्छा योगदान नाकारले तर).

EPFO

5) तोटा :

PF मध्ये जमा होणारी रक्कम कमी होईल, त्यामुळं रिटायरमेंट कॉर्पस (भविष्यात मिळणारी रक्कम) लक्षणीय कमी होऊ शकते. दीर्घकाळात लाखो/करोडो रुपयांचा फरक पडू शकतो.

EPFO

6) कंपन्यांचं धोरण?

कंपनी धोरणानुसार काही ठिकाणी अद्याप पूर्ण सॅलरीवर PF कापला जाऊ शकतो, पण कायद्यानुसार आता तो अनिवार्य नाही.

EPFO

7) अधिक माहितीसाठी..

कर्मचारी कंपनीशी बोलून स्वेच्छा योगदान कमी/जास्त करू शकतात अधिक माहितीसाठी EPFO वेबसाइट किंवा आपल्या HR शी संपर्क साधा.

EPFO

8) पीएफचे नियमही बदलले

त्याचबरोबर पीएफ काढण्याचे नियमही आता बदलले आहेत, हे नियम अधिक सोपे झाले आहेत. यासाठी वेगवान प्रक्रिया आणि कमी कागदपत्रे लागणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EPFO