रेल्वेत परीक्षेविना नोकरीची संधी; 30,000 पगारासह मिळणार 'या' सुविधा

Amit Ujagare

नोकरीची संधी

कुठलीही परीक्षा न देता चांगली नोकरीची संधी तुमच्यासाठी चालून आली आहे. रेल्वेमध्ये यासाठी जागा निघाल्या असून थेट मुलाखतीद्वारे ही कर्मचारी भरती होणार आहे.

IRCTC

IRCTC मध्ये भरती

भारतीय रेल्वेच्या IRCTC मध्ये हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स या पदांसाठी भरती सुरु आहे. या भरती प्रक्रियेची जाहिरात निघाली आहे.

IRCTC

अधिकृत वेबसाईट

इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाईट www.irctc.comवर जाऊन फॉर्म भरता येणार आहे. यासाठी कुठलीही परीक्षा नाही थेट मुलाखत होणार आहे.

IRCTC

IRCTC काय?

IRCTC ही रेल्वेशी संबंधीत एक सरकारी कंपनी असून ज्याद्वारे प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंग, खानपान आणि पर्यटन सुविधा दिली जाते.

IRCTC

शिक्षण किती?

यासाठी कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन या विषयात बीएससी किंवा मिनिस्ट्री ऑफ टुरिझम अंतर्गत बीबीए, एमबीए डिग्री आवश्यक आहे.

IRCTC

वयोमर्यादा किती?

यासाठी वयाची अट ही १ ऑक्टोबर २०२५ रोजी ओपनसाठी कमाल वयोमर्यादा २८ वर्षे तर एससी, एसटी, ओबीसी, पीडब्ल्यूबीडी, एक्स सर्व्हिसमन यांच्यासाठी नियमानुसार सूट असेल.

IRCTC

या राज्यांमध्ये पोस्टिंग

यासाठी तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये पोस्टिंग असणार आहे. पण तरीही त्यांना संपूर्ण देशभरात कुठेही नियुक्ती मिळू शकते.

IRCTC

मेडिकल इन्शुरन्स

या पदांसाठी महिना ३०,००० रुपये बेसिक पगार. तसंच ३५० रुपये दररोजचा भत्ता, आऊट स्टेशनसाठी २४० रुपये भत्ता, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यास ३४८ रुपये भत्ता, ३५ वर्षांपर्यंत १४०० रुपये प्रतिमहिना तर ३६ ते ५० वर्षांपर्यंत २००० रुपये प्रतिमहिना मेडिकल इन्शूरन्स मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

IRCTC