अनुराधा धावडे
राकेश झुनझुनवाला आपल्या वडिलांना त्यांच्या मित्रांसोबत शेअर बाजाराबद्दल बोलताना अनेकदा ऐकायचे. त्यातून झुनझुनवाला यांची मार्केटमधील उत्सुकता वाढली.
राकेश झुनझुनवाला यांची शेअर मार्केटमध्ये असलेली आवड पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना गुंतवणुकीची परवानगी दिली.
1986 मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजारात 5000 रुपये गुंतवले, ज्यावर त्यांना मोठा परतावा मिळाला.
त्यांनी टाटा टीचे शेअर 43 रुपयांना विकत घेतले. अवघ्या तीन महिन्यांत टाटा टीचे शेअर्स 43 रुपयांवरून 143 रुपयांपर्यंत वाढले होते.
त्या गुंतवणूकीवर त्यांना तिप्पट नफा झाला. यानंतर झुनझुनवाला यांनी शेअर बाजारातून अवघ्या तीन वर्षांत 20-25 लाख रुपयांचा नफा कमावला होता.
गेल्या काही वर्षांत राकेश झुनझुनवाला यांनी टायटन, क्रिसिल, सेसा गोवा, प्राज इंडस्ट्रीज, अरबिंदो फार्मा आणि एनसीसीमध्ये मोठी गुंतवणूक केली होती.
परंतू झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ 2008 च्या आर्थिक मंदीमध्ये 30 टक्क्यांनी घसरला, परंतु 2012 मध्ये त्यांचा पोर्टफोलिओ तितक्याच वेगाने सुधारला.
1985 मध्ये फक्त 5000 रुपयांपासून त्यांचा गुंतवणुकीचा प्रवास सुरू केला आणि 2018 पर्यंत त्यांची संपत्ती $5.8 बिलियन इतकी वाढ झाली.
फोर्ब्सच्या अहवालानुसार, राकेश झुनझुनवाला हे भारतातील 36 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.