सरकारनामा ब्युरो
अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) त्याच्या कुटुंबीयांसह लंडनहून सुट्टी संपवून परत आला असताना जुलै 2011 मध्ये त्याला त्याच्या कुटुंबीयांसह एअरपोर्टवर थांबवण्यात आलं होतं. अधिक सामान (लगेज) शाहरुखकडे असल्याने त्याला दीड लाखांचा दंड भरावा लागला. त्यावेळी कस्टमच्या टीमचे प्रमुख समीर वानखेडेच होते.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर समीर वानखेडेंच्या टीमने बिपाशा बसूलाही अडवलं होतं. तिच्याकडे 60 लाखांहून अधिक किंमतीचं सामान होतं. तिला बारा हजार रूपये दंड भरावा लागला होता.
विवेक ओबेरॉय ला सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंटद्वारे कर चुकवल्याप्रकरणी पकडण्यात आलं होतं. 40 लाखांच्या उत्पन्नात कर चुकवल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता. त्यावेळी या विभागाचे डेप्युटी कमिश्नर समीर वानखेडेच होते.
समीर वानखेडेंनी 2011 मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माला (anushka sharma) मुंबई विमानतळावर थांबवलं होतं. तिच्या बॅगा तपासण्यात आल्या होत्या. वानखेडे कस्टम डिपार्टमेंटमध्ये होते. अनुष्काची कस्टमने सुमारे अकरा तास चौकशी केली.
ज्या मार्गाने फक्त विमानतळ कर्मचारी आणि अधिकारी जाऊ शकतात त्या मार्गाने रणबीर कपूर 2013 मध्ये ब्रिटीश एअऱवेजच्या फ्लाईटने लंडनहून मुंबईला आला होता. ४० मिनिटं रणबीरची चौकशी झाल्यानंतर कस्टमने त्याला 60 हजारांचा दंड ठोठावला होता.
मुंबई एअर पोर्टवर मिनिषा लांबाला 2011 ला अडवलं होतं. तिच्या बॅगमध्ये डायमंड ज्वेलरी, किंमती स्टोन होते. यांची किंमत 50 लाखांच्या घरात होती. वानखेडे आणि त्यांच्या टीमने मिनिषा लांबाची सुमारे 16 तास चौकशी केली होती.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. समीर वानखेडे हे त्यावेळी एनसीबीचे झोनल डायरेक्टर होते
कतरीना कैफला 2012 मध्ये मुंबई एअरपोर्टवर फॉरेन एक्स्चेंज रेग्युलेशन अॅक्टच्या अंतर्गत 12 हजार रूपयांचा दंड भरावा लागला होता. लगेज क्लेम न करता तिने एक्झिट घेतली. तिला हा दंड भरावा लागला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.