SDM Oshin Sharma: 'ब्यूटी विथ ब्रेन' तहसीलदार मॅडम पुन्हा अडचणीत; ओशिन शर्मांच्या 'त्या' व्हिडीओनं खळबळ, सरकारचा मोठा निर्णय

Deepak Kulkarni

सोशल मीडियावर सक्रिय

प्रशासकीय अधिकारी ओशिन शर्मा या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांचे 9 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

Tehsildar Oshin Sharma | Sarkarnama

पुन्हा एकदा अडचणीत

हिमाचल सरकारमध्ये ओशीन शर्मा या तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. पण त्या पुन्हा एकदा अडचणीत सापडल्या आहेत.

Tehsildar Oshin Sharma | Sarkarnama

सरकारकडून उचलबांगडी

यापूर्वी त्यांच्यावर सोशल मीडियाच्या नादात सरकारी कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारकडून उचलबांगडी करण्यात आली होती.

Tehsildar Oshin Sharma | Sarkarnama

नवा वाद

हिमाचल प्रदेश प्रशासकीय सेवेच्या शर्मा या 2020 च्या बॅचच्या अधिकारी आहेत. फिटनेस आणि ज्वेलरी संबंधित खासगी उत्पादनांचं प्रमोशन केल्यानं त्या नव्या वादात सापडल्या आहेत.

Tehsildar Oshin Sharma | Sarkarnama

नियमांचं उल्लंघन

सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना पूर्वसंमतीशिवाय कुठल्याही खासगी व्यवसाय, स्पर्धा यांच्यासह प्रमोशनल अशा कार्यक्रमांमध्ये थेट सहभाग नोंदवण्यास सक्त मनाई असते. शर्मा यांच्याकडून याच नियमांचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Tehsildar Oshin Sharma | Sarkarnama

खटकणारी बाब

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत ओशिन शर्मा यांच्याकडून न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स आणि प्रोटीन बारचे अनबॉक्सिंग करताना दिसून येत आहेय हीच बाब अनेकांना खटकली आहे.

Tehsildar Oshin Sharma | Sarkarnama

मुख्य सचिवांकडून गंभीर दखल

हिमाचल प्रदेश सरकारच्या मुख्य सचिव संजय गुप्ता यांनी ओशिन शर्मा यांच्याबाबतच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे.

Tehsildar Oshin Sharma | Sarkarnama

चौकशीचे आदेश

राज्य सरकारकडून याप्रकरणी शिमला डेप्युटी कमिशनर अनुपम कश्यप यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. वाद पेटल्यानंतर तहसीलदार शर्मा यांनी कारवाईच्या धास्तीनं हा प्रमोशनल व्हिडीओ सोशल मीडियावरच्या सर्व अकाऊंटवरुन डिलीट केला आहे.

Tehsildar Oshin Sharma | Sarkarnama

9 लाखांपेक्षा जास्त अधिक फॉलोअर्स

ओशिन शर्मा यांना सोशल मीडियावर ‘इन्फ्लुएंसर SDM’ प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब अशा सर्व प्लॅट फॉर्मवर त्यांची जबरदस्त क्रेझ आहे. त्यांना 9 लाखांपेक्षा जास्त अधिक फॉलोअर्स आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tehsildar Oshin Sharma | Sarkarnama