Shankarrao Gadakh : भाजपकडून पराभव, ठाकरेंच्या पठ्ठ्याला आता शिवसेनेकडून आव्हान

Pradeep Pendhare

ज्येष्ठ नेते यशवंतरावांचे पुत्र

ज्येष्ठ नेते तथा साहित्यिक यशवंतराव गडाख यांचे पुत्र शंकरराव गडाख हे अहमदनगर जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित राजकीय घराण्यातील आहेत. त्यांचा जन्म 29 मे 1970 रोजी झाला. बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतले.

Shankarrao Gadakh | Sarkarnama

'पाणीदार आमदार' म्हणून ओळख

राजकीय, सहकार आणि साखर कारखाना क्षेत्रात मोठा दबदबा असून, शंकररावांनी मुख्यत्वे पाणी समस्यांवर काम करतात. विधानसभा सदस्यत्वाचा पाणी संघर्षासाठी उपयोग केल्याने त्यांना ‘पाणीदार आमदार’ म्हणून ओळखले जाते.

Shankarrao Gadakh | Sarkarnama

तरुणपणात मोठी संधी

शंकरराव गडाख यांना आशिया खंडातील नामांकित बँकांपैकी एक असलेल्या नगर जिल्हा सहकारी बँकेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

Shankarrao Gadakh | Sarkarnama

आमदारकी मिळवली

1995 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी शंकरराव गडाख यांनी युवक काँग्रेसचे प्रचारक म्हणून सुरवात केली.

Shankarrao Gadakh | Sarkarnama

भाजपकडून पराभव

2009 ते 2014 पर्यंत नेवासा मतदारसंघात ते आमदार होते. 2014 च्या निवडणुकीत त्यांचा भाजपकडून पराभव झाला.

Shankarrao Gadakh | Sarkarnama

पक्षाची स्थापना

या पराभवानंतर शंकरराव गडाखांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाची स्थापना केली. 2019 च्या निवडणुकीत पुन्हा आमदार झाल्यावर त्यांनी 11 ऑगस्ट 2020 रोजी त्यांचा पक्ष विसर्जित करत शिवसेनेत प्रवेश केला. ते अजूनही ठाकरेंसोबत आहेत.

Shankarrao Gadakh | Sarkarnama

शिवसेनेत प्रवेश अन् मंत्री

महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे मृद व जलसंधारण मंत्री पद होते. तसेच उस्मानाबाद, आताचे धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री होते.

Shankarrao Gadakh | Sarkarnama

गडाखांना शिवसेनेकडून आव्हान

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात असलेल्या शंकरराव गडाख यांचा नेवासा मतदारसंघ असून त्यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून या विधानसभेला आव्हान मिळू लागले आहे.

Shankarrao Gadakh | Sarkarnama

NEXT : ओम प्रकाश राजभर यांची पुन्हा एकदा 'सुभासपा'च्या अध्यक्षपदी निवड!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा :