'सरपंच' असावा तर असा! प्रत्येकाच्या तोंडी एकच नाव...

Rajanand More

सरपंच

भारतात गावचा म्हणजे ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच म्हटले जातो. थोडक्यात काय तर गावगाडा सांभाळणारा गावकऱ्यांचा नेता. इतर सदस्यांच्या सहकार्याने तो गावचा विकास करत असतो.

Shreyas Iyer | Sarkarnama

क्रिकेटमध्ये सरपंच

क्रिकेटमध्येही एका सरपंचाचा उदय झाला आहे. हा सरपंच म्हणजे धडाकेबाज क्रिकेटपटू श्रेयस अय्यर. त्याचे फॅन अन् क्रिकेट जगतात सध्या तो ‘सरपंच साहेब’ म्हणून प्रसिध्द झालाय.

Shreyas Iyer | Sarkarnama

का म्हणतात?

श्रेयस हा सध्या आयपीएलमधील पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार असून त्याने आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचवलं आहे. तब्बल 11 वर्षांनी हा संघ अंतिम सामन्यात पोहचला आहे.     

Shreyas Iyer | Sarkarnama

यशस्वी कर्णधार

कर्णधार म्हणून श्रेयसने आतापर्यंत तीन संघाना अंतिम सामन्यात पोहचवले आहे. त्यापैकी एका संघाला त्याने विजेतेपद मिळवून दिले आहे. असे करणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे.

Shreyas Iyer | Sarkarnama

प्रत्येकाच्या तोंडी सरपंच साहेब

श्रेयसच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे तो सरपंच साहेब बनला आहे. संघाला पुढे घेऊन जाणारा खेळाडू म्हणून तो पंजाबचा सरपंच बनला आहे. विशेषत: पंजाबमध्ये त्याची भरतील क्रेझ आहे.

Shreyas Iyer | Sarkarnama

हरभजन सिंगही चाहता

आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांच्या तोंडीही श्रेयसचा उल्लेख सातत्याने सरपंच असा केला जातो.

Shreyas Iyer | Sarkarnama

आमदारकीची ऑफर

सोशल मीडियात श्रेयसच्या चाहत्यांकडून त्याला ऑफर दिल्या जात आहेत. अंतिम सामन्यात जिंकल्यास पंजाबमधून आमदार करू, असे चाहते म्हणत आहेत. त्याला जमीन देण्याच्या, घर बांधून देण्याच्या ऑफरही दिल्या जात आहेत.

Shreyas Iyer | Sarkarnama

लढाई हरलो, युध्द नाही

आयपीएल मधील क्वालिफायह-1 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुध्द पराभव झाल्यानंतर श्रेयस म्हणाला होता, लढाई हरलो, पण युध्द नाही. आता मुंबई इंडियन्सविरुध्दच्या विजयानंतर त्याचे हे शब्द प्रचंड व्हायरल होत आहेत. 

Shreyas Iyer | Sarkarnama

NEXT : तिच्या अटकेमुळे देशभरात उठले वादळ! कोण आहे पुण्यात शिकणारी शर्मिष्ठा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा.