राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

अनुराधा धावडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्वात आधी मतदानाचा हक्क बजावला. 

राज्यसभा निवडणुकीसाठी एमआयएमचा महाविकासआघाडीला पाठिंबा. पण शिवसेनेला मत देणार नाही. एमआयएम कॉंग्रेस उमेदवारी इमरान प्रतापगढी यांना मत देणार .

गंभीर आजाराने त्रस्त असतानाही पुण्यातील भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळकही बजावणार मतदानाचा हक्क. आज सकाळीत अॅब्युलन्समधून मुंबईकडे रवाना

काँग्रेस आपली 44 म्हणजे सगळी मते ही आपलाच उमेदवार म्हणजे इम्रान प्रतापगढी यांना देणार

राज्यसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी अनिल देशमुख, नवाब मलिक यांची उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी

राज्यसभेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होणारच, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

सत्र न्यायालयानंतर उच्च न्यायालयानेही नवाब मलिकांना मतदानाची परवानगी नाकारली. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर हायकोर्ट ही ठाम

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे मतदानासाठी विधानभवनात दाखल

Aditya Thackeray

आदित्य ठाकरेंच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CM Uddhav Thackeray