सरकारनामा ब्युरो
विरोधी आघाडीकडून माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
अल्वा यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गोव्यात देखील या नावाची चर्चा होवू लागली आहे. कारण अल्वा आणि गोवा यांचे एक खास नाते राहिले आहे.
मार्गारेट अल्वा माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्या आहेत. अल्वा यांनी यापूर्वी राजस्थान, गोवा, गुजरात आणि उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून काम केले आहे.
70 च्या दशकात कर्नाटकातील पहिल्या महिला ब्लॉक अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
1972 मध्ये त्या कर्नाटकातील काँग्रेसच्या महिला शाखेच्या प्रमुख बनल्या.
1974 ते 1998 या काळात अल्वा कर्नाटकमधून राज्यसभेच्या सदस्य होत्या. तर 1999 ते 2004 पर्यंत लोकसभेच्याही सदस्य होत्या.
1999 मध्ये त्या उत्तर कन्नड मतदारसंघातून 13व्या लोकसभेवर निवडून आल्या.
अल्वा यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव या पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात संसदीय कार्य, युवा आणि क्रीडा, महिला आणि बाल विकास या मंत्रालयांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री (MoS) म्हणून काम केले आहे.
पुढे 2009 मध्ये अल्वा यांची उत्तराखंडच्या राज्यपालपदी वर्णी लागली. तर 2012 मध्ये त्यांना राजस्थानच्या राज्यपालपदी पाठविण्यात आले. राजस्थानचे राज्यपाल म्हणून काम करत असताना त्यांच्याकडे गुजरात आणि गोवा या राज्यांचीही काही दिवसांसाठी अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.