कॉंग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार कोण आहेत इमरान प्रतापगढी?

सरकारनामा ब्युरो

इमरान यांच संपूर्ण नाव मोहम्मद इमरान खान असं आहे. इमरान प्रतापगढी हे उत्तरप्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील बेल्हा येथील रहिवासी आहेत. 6 ऑगस्ट 1987 रोजी शमशेरगंज याठिकाणी त्यांचा जन्म झाला.

Imran Pratapgarhi

प्रतापगढ जिल्ह्याच्या नावावरून त्यांनी स्वत:च नाव इमरान प्रतापगढी असं बदलून घेतलं. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठीतून हिंदी भाषेतून एमए ची पदवी संपादन केली आणि त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमाही केला आहे.

Imran Pratapgarhi

इमरान प्रतापगढी यांचे वडील डॉ. इलियास हे पेशाने डॉक्टर होते. कुटूंबात चार भावंडांमध्ये इमरान सर्वात मोठे आहेत. 2019मध्ये त्यांनी आपल्या राजकीय करिअर सुरूवात केली. काँग्रेसने मुरादाबाद लोकसभेचं तिकीट दिलं होतं.

Imran Pratapgarhi

नोव्हेंबर 2018मध्ये एका कार्यक्रमात राहुल गांधींसोबत झालेल्या भेटीनंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रतापगढी हे राहुल गांधीचे अत्यंत निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जातं.

Imran Pratapgarhi

बिहार, आसाममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रतापगढी यांनी काँग्रेसचे स्टारप्रचारक म्हणून काम केलं. इतकंच नव्हे तर साहित्य आणि कला क्षेत्राशी संबंधित असलेले प्रतापगढी हे यूपी, बिहारमध्ये ते शायर म्हणून प्रसिद्ध आहेत.

Imran Pratapgarhi

प्रतापगढी यांचे फेसबुकवर दहा लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवरही साडे तीन लाखांहून अधिक लोक त्यांना फॉलो करत असतात.

Imran Pratapgarhi

प्रतापगढी यांचे फेसबुकवर दहा लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवरही साडे तीन लाखाहून अधिक लोक त्यांना फॉलो करत असतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Imran Pratapgarhi