कोण आहेत पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ?

सरकारनामा ब्युरो

पाकिस्तानातील अनेक राजकीय घडामोडींनतर इमरान खान यांना पायउतार व्हावे लागले आणि त्यांच्या जागी शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली.

शाहबाज शरीफ हे देशाचे 23 वे पंतप्रधान बनले आहेत. पाकिस्तानी सिनेटचे चेअरमन सादिक संजरानी यांनी पंतप्रधानपदाची शपथ दिली.

शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे लहान भाऊ आहेत. सोमवारी पाकिस्तानच्या संसदेने शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. त्यांना 174 मते मिळाली.

वास्तविक शाहबाज शरीफ यांनी एकूण पाच विवाह केले आहेत.1973 मध्ये वयाच्या 23 व्या वर्षी त्यांनी नुसरत शाहबाजसोबत लग्न केले, 1993 मध्ये आलिया हनीशी दुसरे लग्न केले.

तर 1994 मध्ये निलोफर खोसासोबत तिसरे, 2003 मध्ये तेहमीना दुर्राणी यांच्याशी चौथे आणि 2012 मध्ये कलसुम हाय यांच्याशी पाचवे लग्न केले.

शाहबाज शरीफ यांच्याकडे मोठा राजकीय अनुभव आहे. ते चांगले राज्यपाल राहिले आहेत. विशेष म्हणजे त्यांचे पाकिस्तान लष्कराशी चांगले संबंध आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.