Roshan More
अण्णा द्रविड मुनेत्र कळगम (AIADMK) तामिळनाडूमधील महत्त्वाचा पक्ष सत्ते बाहेर राहिला आहे. विजयच्या टीव्हीकेने सत्ता मिळवली. तर, डीएमके दुसऱ्या स्थानावर आहे.
सत्तास्थापन करणाऱ्या टीव्हीकेला पाठींबा देण्यावरून एडीएमकेमध्ये फूट पडल्याची चर्चा आहे. 47 पैकी 30 आमदार टीव्हेकेला पाठींबा देण्याच्या बाजुचे आहेत.
डीएमकेमधून फूटून एडीएमके स्थापना 1972 मध्ये सिनेअभिनेता एम.जी. रामचंद्रन यांनी केली.
1977 मध्ये एडीएमके सत्तेत आला. एम जी रामचंद्रन हे मुख्यमंत्री झाले. 1980 मध्ये ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.
1987 ला रामचंद्रन यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री जयललिता यांच्या पक्षावर ताबा मिळवण्यासाठी वाद झाला.
जयललिता यांनी पक्ष आपल्या ताब्यात घेत तमिळनाडूमध्ये सत्ता मिळवली. त्या मुख्यमंत्री देखील झाल्या.
जयललिता यांच्या निधनानंतर ई.के. पलनीस्वामी हे पक्षाचे नेतृत्व करत आहेत. जललितांच्या निधनानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री देखील झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.