Shishir Shinde : बाळासाहेबांच्या एका आदेशावर वानखेडेची पिच उखडणारा नेता सध्या काय करतो?

सरकारनामा ब्युरो

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आशिया कप भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध दर्शवला आहे.

Uddhav Thackeray | Sarkarnama

पहलगामधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेले ऑपरेशन सिंदूर यामुळे ठाकरे यांनी या सामन्याला विरोध दर्शविला आहे.

Operation Sindoor | Sarkarnama

यापूर्वीही शिवसेनेने अनेकदा भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध दर्शविला आहे. सामना होऊ नये यासाठी सेनेने आंदोलनेही केली होती.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

1991 मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधामुळे शिशिर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेतील सामना होवू दिला नव्हता.  

Shishir Shinde | sarkarnama

शिशिर शिंदेंनी सहकाऱ्यांसह कुदळ-फावड्यांनी वानखेडे स्टेडियमचे पिच उखडले होते. पिचवर इंजिन ऑईलही टाकले. पिच खराब झाल्याने सामना रद्द करावा लागला.

Wankhede Stadium | Sarkarnama

त्या घटनेनंतर बाळासाहेबांनी शाब्बासकीची थाप दिली. शिशिर शिंदे महापालिकेत नगरसेवक झाले. 1996 ते 2002 या काळात ते विधानपरिषदेचे सदस्य झाले.

Shishir Shinde | Sarkarnama

पण 2006 मध्ये त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. 2009 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला.

Shishir Shinde | Sarkarnama

2009 मध्ये शिशीर शिंदे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. पण सभागृहात शपथविधीपूर्वीच आबू आझमी यांना मारहाण केल्यामुळे शिंदे यांचे निलंबन झाले.

Shishir Shinde | Sarkarnama

12 वर्षे शिशिर शिंदे यांनी मनसेत अनेक पदांवर काम केले. 2018 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण 2023 मध्ये त्यांनी ठाकरेंनाही रामराम केला.

Shishir Shinde-Uddhav Thackeray | Sarkarnama

शिशिर शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. सध्या ते याच पक्षात असून त्यांच्याकडे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे.

Shishir Shinde-Eknath Shinde | Sarkarnama

Tuljapur Temple VIP Pass : तुळजापूर संस्थानचा नवरात्रौत्सव काळातच देवीभाविकांना धक्का; व्हीआयपी दर्शन पास महागणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tulja Bhavani Temple | Sarkarnama
येथे क्लिक करा