Aslam Shanedivan
8 व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वाचे पाऊल उचलत दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वाचे पाऊल उचलत दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय दूरसंचार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या टपाल विभागाचा असून ‘बाल शिक्षण भत्त्या’ शी संबंधित नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे.
या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि वसतिगृहाच्या खर्चासाठी पूर्वीपेक्षा अधिक आर्थिक मदत मिळणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर, आता नर्सरी, एलकेजी आणि युकेजीसारख्या पूर्व-प्राथमिक वर्गांसाठीही या भत्त्याचा दावा करता येईल.
नवीन नियमांनुसार, दरमहा 2,812.5 रुपये शिक्षण भत्ता तर वसतिगृहात शिक्षण घेण्यासाठी दरमहा 8,437.5 रुपये इतके वसतिगृह अनुदान मिळेल.
या भत्त्याचा लाभ घेण्यासाठी केवळ शाळेच्या मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र लागेल. पण प्रमाणपत्रात राहण्या-खाण्याचा खर्च नमूद अनिवार्य असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.