RSS च्या बालेकिल्लात BJP चा पराभव करून काँग्रेसवरील ‘शून्याचा टॅग’ हटवणारे अभिजित वंजारी कोण?

Aslam Shanedivan

विधान परिषद निवडणूक

राज्यात नुकत्याच विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका झाल्या. यात महाविकास आघाडीला 3 आणि महायुतीला दोन जागा मिळाल्या आहेत.

MLC Abhijit Wanjarri | Sarkarnama

RSS

यापैकी नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने मोठा विजय मिळवला असून RSS च्या बालेकिल्लात BJP चा पराभव केला आहे.

MLC Abhijit Wanjarri | Sarkarnama

अभिजीत वंजारी

2020 च्या निवडणुकीप्रमाणेच काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी याही वेळी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. यावेळी भाजपच्या सुधाकर कोहळेंना पराभवाचा धक्का बसला आहे.

MLC Abhijit Wanjarri | Sarkarnama

पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका करत किती जागा आल्या असा प्रश्न विचारला होता. देशभरात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता.

MLC Abhijit Wanjarri | Sarkarnama

‘शून्याचा टॅग’

पण काँग्रेसवरील ‘शून्याचा टॅग’ अखेरच्या क्षणी काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी पुसत अक्षरश: भाजपच्या कोहळेंकडून विजय खेचून आणला आहे.

MLC Abhijit Wanjarri | Sarkarnama

NSUI चे महामंत्री

अभिजीत वंजारी व्यवसायाने वकील असून ते नागपूर विद्यापीठाच्या सिनेट आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्यही, महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआय (NSUI) चे महामंत्री होते.

MLC Abhijit Wanjarri | Sarkarnama

निवडणूक पर्यवेक्षक

त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदाचीही जबाबदारी होती. तसेच त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहार येथे निवडणूक पर्यवेक्षक म्हणूनही काम केलं आहे.

MLC Abhijit Wanjarri | Sarkarnama

वडिलही आमदार

अभिजीत वंजारी यांचे वडील स्वर्गीय गोविंदराव मारोतराव वंजारी हे देखील काँग्रेसचे नेते आणि दक्षिण नागपूरचे दोन वेळा आमदार होते.

MLC Abhijit Wanjarri | Sarkarnama

अमरावती शिक्षकच्या निवडणुकीत पराभूत होऊनही काँग्रेसच्या अदिती पोहरेंची का होतेय चर्चा..?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा