अपघातानंतर भलेमोठे आगीचे लोळ का? हे आहे मोठं कारण...

Rajanand More

विमान अपघात

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा गुरूवारी (ता. 12) दुपारी भीषण अपघात झाला. या विमानात 230 प्रवाशांसह 10 क्रू मेंबर व दोन पायलट होते.

Air India Flight Crash | Sarkarnama

उड्डाण अन् अपघात

विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच काही सेकंदात तांत्रिक बिघाड झाला आणि मेघानीनगर परिसरातील नागरी वस्तीतील इमारतींवर हे विमान कोसळले.

Air India Flight Crash | Sarkarnama

आगीचे लोळ

अपघात होताच घटनास्थळी मोठे आगीचे लोळ व धुराचे लोट दिसत होते. मोठा धमाका झाल्याचा आवातही परिसरातील नागरिकांना ऐकू आला. घटनास्थळी भीषण आगीचे साम्राज्य होते.

Air India Flight Crash | Sarkarnama

कारण काय?

भलेमोठे आगीचे लोळ उठण्यामागचे कारण समोर आले आहे. विमानामध्ये उड्डाणावेळी तब्बल 1 लाख 25 हजार लिटर जेट इंधन होते.

Air India Flight Crash | Sarkarnama

ड्रीमलायनर विमान

अपघातग्रस्त विमान ड्रामलायनर प्रकारातील होते. त्यामध्ये 248 प्रवासी बसू शकतात. उड्डाण केल्यानंतर हे विमान 13 हजार 620 किलोमीटर प्रवास करू शकते. त्यामुळे त्याची क्षमताही अधिक असते.

Air India Flight Crash | Sarkarnama

टायमिंग महत्वाचे

उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमानाचा अपघात झाला. त्यामुळे विमानातील इंधनची टाकी पूर्ण भरलेली होती. परिणामी अपघातानंतर याच इंधनाने लगेच पेट घेतला असावा. त्यामुळे अचानक मोठी आगीचा भडका उडाला असावा.

Air India Flight Crash | Sarkarnama

कारण अस्पष्ट

अपघातामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Air India Flight Crash | Sarkarnama

जीवितहानी किती?

विमान दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला आहे किंवा किती प्रवासी वाचले आहेत, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Air India Flight Crash | Sarkarnama

NEXT : कोसळलेल्या विमानात कोणत्या देशाचे किती प्रवासी होते?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा.