आमदाराची 'ऐश्वर्या', सौंदर्यावर अख्खं बिहार घायाळ!

Rajanand More

ऐश्वर्या राज

ऐश्वर्या राज या बिहारमधील तरारी मतदारसंघातील भाजपचे आमदार विशाल प्रशांत यांच्या पत्नी आहेत. तर बाहुबली नेते सुनील पांडेय हे त्यांचे सासरे. ते चारवेळा आमदार होते.

Aishwarya Raj | Sarkarnama

मिस बिहार

ऐश्वर्या यांनी आता मिसेस बिहार 2025 हा किताब पटकावला आहे. त्यामुळे त्यांची ओळख आता आमदार पत्नी नव्हे तर मिसेस बिहार बनली आहे.

Aishwarya Raj | Sarkarnama

कशी झाली निवड?

बिहारमध्ये 21 ते 55 वयोगटातील विवाहित महिलांसाठी मिसेस बिहार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अंतिम फेरीत 13 स्पर्धकांना मागे टाकत ऐश्वर्या यांनी या किताबावर आपले नाव कोरले.

Aishwarya Raj | Sarkarnama

राजकारणापासून दूर

ऐश्वर्या या राजकारणापासून दूर असतात. त्यांच्या सोशल मीडियावरही राजकारणाशी संबंधित पोस्ट नसतात. मात्र, पतीला त्यांच्याकडून सर्व मदत केली जाते.

Vishal Prashant, Aishwarya Raj | Sarkarnama

उच्चशिक्षित

ऐश्वर्या मुळच्या पटनाच्या असून उच्चशिक्षित आहेत. खगौल येथे त्यांनी केंद्रीय विद्यालयातून शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून बीकॉम तर पटना विद्यापीठातून एमबीएची पदवी मिळवली.

Vishal Prashant, Aishwarya Raj | Sarkarnama

एअर होस्टेस

एअर होस्टेस बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी गुरूग्राम येथील एका खासगी इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षण अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.

Aishwarya Raj | Sarkarnama

पाच वर्षांपूर्वी विवाह

विशाल प्रशांत यांच्याशी ऐश्वर्या यांचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. त्यांना एक मुलगाही आहे. ते कुटुंबासह दिल्लीतच वास्तव्याला असतात.

Vishal Prashant, Aishwarya Raj | Sarkarnama

पतीकडून अभिनंदन

पतीसह सासऱ्यांनी ऐश्वर्या यांचे अभिनंदन केले आहे. तसेच भाजप, जेडीयूच्या काही नेत्यांनीही ऐश्वर्या यांचा किताब मिळाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट करत त्यांचे अभिनंदन केले आहे.  

Aishwarya Raj | Sarkarnama

NEXT : गँगस्टर अरूण गवळीची लेक ठाकरेंना धक्का देणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा.