Roshan More
राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज पुणे महापालिकेसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.
आपल्या जाहीरनाम्यात पुणेकरांसाठी प्राधान्याने पूर्ण करण्याच्या आठ कामांची हमी देण्यात आली आहे.
शहरातील सर्व प्रभागात उच्च दाबाने दररोज पाणी पूरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच टँकर माफियांचे उच्चाटन करणार असल्याचे सांगितले आहे.
पुणे शहरातील रस्ते खड्डेमुक्त, तसेच ट्रॅफिक मुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे.
शहरातील बंद पडलेले कचरा प्रकल्पांची आवश्यक संरचनात्मक सुधारणा करतते पुन्हा कार्यान्वित करण्यात येतील. नियमित स्वच्छता करत स्वच्छ सर्वेक्षणात स्थान मिळवणार
पुण्यातील रुग्णालयांवर विशेष लक्ष दे हायटेक आरोग्य सुविधा देणार
शहर प्रदूषणमुक्त करणार, तसेच हरित क्षेत्रांचे संरक्षण, संवर्धन आणि विस्तार करणार
झोपडपट्याचे पुनर्वसन, गुंठेवारी नियमितीकरण करणाचे आश्वासन
मेट्रो, पीएमपी बसचा प्रवास मोफत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन तसेच 150 पुणे माॅडेल शाळांना मंजुरी
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.