Rajanand More
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाचे सर्वाधिक काळ गृहमंत्री म्हणून विक्रम केला आहे. त्यांना हे पद स्वीकारले त्या घटनेला मंगळवारी (ता. 5) 2 हजार 258 दिवस पूर्ण झाले.
पहिली थपथ कधी?
देशात भाजपची 2014 पासून सत्ता आहे. नरेंद्र मोदी हे तेव्हापासून सलग 11 वर्षे पंतप्रधान आहेत. मात्र, अमित शाह हे 30 मे 2019 गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
शहांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा सर्वाधिक काळ गृहमंत्रिपदाचा विक्रम मोडला आहे. तसेच गोविंद वल्लभ पंत यांनाही शहांनी मागे टाकले आहे.
अडवाणी हे 19 मार्च 1998 ते 22 मे 2004 या काळात 2 हजार 256 दिवस केंद्रीय गृहमंत्रिपदावर कार्यरत होते. त्यापाठोपाठ गोविंद वल्लभ पंत यांचा कार्यकाळ सर्वाधिक म्हणजेच 6 वर्षे 56 दिवसांचा होता.
अमित शहांनी 5 ऑगस्टला हा विक्रम केला आहे. याचदिवसी 2019 मध्ये संसदेत जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटविल्याची घोषणा करण्यात आली होती.
शहा हे काहीकाळ गुजरातचेही गृहमंत्री होते. तसेच ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षही होते. त्यांच्याच कार्यकाळात भाजपला 2024 मध्ये केंद्रात सत्ता मिळाली.
जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचा निर्णय शहांच्या कार्यकाळातील सर्वात मोठा निर्णय ठरला. त्यानंतर या राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, यासाठीही गृह विभागाने परिश्रम घेतले होते.
इंग्रजांच्या काळातील फौजदारी कायदेही शहांच्या काळात रद्द करण्यात आले. त्याऐवजी तीन नवे कायदे तयार करण्यात आले. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याही काही राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.