Rashmi Mane
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमध्ये 15 जानेवारी रोजी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये संपूर्ण देशाचे लक्ष एका खास महानगरपालिकेकडे लागले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात BMC. कारण BMC ही भारतातील सर्वात श्रीमंत आणि संसाधनसंपन्न महापालिका मानली जाते.
मुंबईसारख्या आर्थिक राजधानीची जबाबदारी सांभाळणारी BMC केवळ प्रशासकीय संस्था नाही, तर हजारो कोटींच्या बजेटवर चालणारी यंत्रणा आहे. तिचा वार्षिक अर्थसंकल्प अनेक राज्यांच्या नगरपालिकांपेक्षाही मोठा आहे.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये BMC चा अर्थसंकल्प सुमारे 59,954 कोटी होता. तुलनेत दिल्ली महापालिकेचा बजेट 16,683 कोटी, तर बेंगळुरू महापालिकेचा 12,369 कोटी इतकाच होता. कोलकात्याचा बजेट तर फक्त 5,166 कोटी आहे.
गेल्या दहा वर्षांत BMC चा बजेट जवळपास दुप्पट झाला आहे. 2025-16 मध्ये खर्च 20,500 कोटी होता, तो आता 44.500 कोटींवर पोहोचला आहे. यावरून मुंबईच्या विकासावर होणाऱ्या गुंतवणुकीची कल्पना येते.
BMC ची उत्पन्नाची अनेक स्रोत आहेत. विविध सेवा, परवाने, वापर शुल्क हे सर्वात मोठे उत्पन्नाचे साधन आहे. याशिवाय केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदान, कर आणि गुंतवणुकीवरील व्याजातूनही मोठी रक्कम मिळते.
BMC चा सर्वाधिक खर्च रस्ते, पूल, ड्रेनेज, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, सुरक्षा व्यवस्था, कर्मचारी पगार आणि पेन्शन यावर होतो. शहराच्या देखभाल आणि विकासासाठी 10 वर्षांत 1,11,600 कोटी खर्च करण्यात आले.
रुग्णालये, शाळा, ग्रंथालये आणि विविध योजनांसाठी हजारो कोटींची तरतूद केली जाते. प्रशासन, जाहिरात, कायदेशीर बाबी, वाहतूक आणि इंधन यावरही मोठा खर्च होतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.