Deepak Kulkarni
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या निकटवर्तीय मोहम्मद शहाबुद्दीन यांनी तब्येतीचं कारण देत मुदत संपण्याआधीच राष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला होता.
त्यामुळे 1991 नंतर पहिल्यांदाच म्हणजेच तब्बल 35 वर्षांनी बांगलादेशात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत थेट लढत पाहायला मिळाली.
बांगलादेशच्या राष्ट्रपती पदासाठी BNP चे उमेदवार मिर्जा फखरुल इस्लाम आलमगीर आणि कर्नल (निवृत्त) ओली अहमद यांच्यात थेट लढत झाली.
सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे उमेदवार मिर्जा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी या निवडणुकीत मोठा विजय मिळवला.
बीएनपीचे मिर्जा फखरुल इस्लाम आलमगीर यांना 255 तर विरोधी उमेदवार कर्नल (निवृत्त) ओली अहमद यांना या निवडणुकीत अवघे 88 मते मिळाली.
बांगलादेशच्या राष्ट्रपतिपदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत 349 नोंदणीकृत मतदारांपैकी 343 जणांनी मतदान केलं. तर 6 खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही.
बांगलादेशचे 23 वे राष्ट्रपती म्हणून 78 वर्षीय मिर्जा फखरुल इस्लाम आलमगीर हे शुक्रवारी, 21 ऑगस्टला बंगभवनच्या दरबार हॉलमध्ये ते शपथ घेणार आहेत.
बांगलादेशात झालेल्या मोठ्या हिंसाचार आणि सत्तांतरानंतर राष्ट्रपतीच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं होतं.
विशेष म्हणजे 1991 नंतर आजतागायत बांगलादेशात सर्वसाधारणपणे सर्वसंमतीनं राष्ट्रपतिपदासाठी बिनविरोध निवड करण्यात येत होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.